Ad will apear here
Next
डोक्याचे सर्व्हिसिंग
आपल्या अवतीभोवती अनेक प्रसंग घडत असतात. त्यांकडे निखळतेने पाहत, त्यातील विनोदी अंग ओळखून सुरेशचंद्र वाघ त्यांनी त्यांचा कथांमध्ये वापर केला आहे. या कथा ‘डोक्याचे सर्व्हिसिंग’ या संग्रहातून वाचायला मिळतात.

देशात आज अनेक क्षेत्रांत भ्रष्टाचार दिसून येतो. या भ्रष्टाचाराची लागण होऊ नये यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक लस तयार होते. ती घेण्यासाठी केंद्रावर गेल्यानंतर नायकाला आलेले अनुभव विनोदी शैलीत ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक लस’मधून मांडले आहेत. पिंटूचा अभ्यास घेण्यासाठी विकत आणलेला रोबो, त्याचे शिकवणे व ऑपरेटिंग सिस्टिममध्ये बिघाड झाल्यानंतरच्या समस्या ‘रातोबाशाची शाळा’मध्ये आहेत.

आजच्या बदलत्या मार्केटिंग पद्धतीवर ‘जुनी बायको द्या नवी बायको घ्या’ यातून भाष्य केले आहे. सध्या हेल्मेट सक्तीचा विषय रोज चर्चेत आहे. या संग्रहातही ‘हेल्मेटची ऐशीतैशी’ या कथेत विनोद फुलवत प्रबोधनात्मक मांडणी केली आहे. काळा पैसा, तंत्रज्ञानने व्यापलेले जीवन, मोलकरणीची गरज, चिमण्यांची घटती संख्या रोजचे विषय कथांमधून मांडले आहेत.

पुस्तक : डोक्याचे सर्व्हिसिंग
लेखक : सुरेशचंद्र वाघ
प्रकाशक : प्रियांका प्रशांत पटवर्धन
पाने : १९२
किंमत : २२० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZWPBW
Similar Posts
ही व्यवस्था काय आहे? गंभीर आणि महत्त्वपूर्ण विषयांवर राजीव कालेलकर यांनी केलेले विचारप्रवृत्त करणारे हे लेखन. या पुस्तकातील लेखांमध्ये अपंगत्व, दलित, स्त्रीप्रश्न, मैत्री, संगीत, मार्क्सवाद, संस्कृती इत्यादींवर भाष्य केले आहे.
एन to पी : नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन रुग्णांच्यादृष्टीने डॉक्टर देव असतात; पण त्यांच्याही आयुष्यात सर्वसामान्यांप्रमाणे सुख-दुःख, ताण-तणाव, आनंदाचे, संकटाचे किंवा आर्थिक अडचणींचे प्रसंग येत असतात. अशा प्रसंगांना डॉ. सोपान चौगुले यांनी ‘एन to पी (नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन)’ या पुस्तकातून शब्दरूप दिले आहे.
अनामिका एक - रूपे अनेक ‘अनामिका एक - रूपे अनेक’ या कथासंग्रहाचा परिचय...
हॅलो मी प्रतिमानव शाळा-महाविद्यालयीन पुस्तकांमधील विज्ञान हे आपल्या रोजच्या जीवनचाच भाग असते. सध्याच्या यांत्रिक युगात तर विज्ञानशिवाय पान हालत नाही. यंत्रमानवासारख्या संकल्पना काही वर्षांपूर्वी काल्पनिक वाटत होत्या, त्या आता प्रत्यक्षात आल्या आहेत. यातूनच शरद पुराणिक यांनी विज्ञानरंजक कथा ‘हॅलो मी प्रतिमानव’मध्ये लिहिल्या आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language